Akshay Tritiya 2026 Date: हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. हा दिवस केवळ सोने खरेदीसाठीच नाही, तर नवीन कार्यारंभासाठी देखील अत्यंत फलदायी ठरणारा मानला जातो. २०२६ मध्ये अक्षय्य तृतीया कधी आहे आणि शुभ मुहूर्त कोणता आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
हे ही वाचा : Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
'अक्षय्य' म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असे. वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा होणारा हा सण जीवनात सुख, संपत्ती आणि सौभाग्य घेऊन येतो. या दिवशी केलेले दान आणि खरेदी अक्षय्य राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
१. अक्षय्य तृतीया तिथी (Akshaya Tritiya Tithi)
२०२६ मध्ये अक्षय तृतीया रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी साजरी केली जाईल.
तृतीया तिथी प्रारंभ: १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.४९ मिनिटांनी सुरु होईल
तृतीया तिथी समाप्ती: २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी. ७.२६ मिनिटांनी संपेल.
२. अक्षय्य तृतीया १९ तारखेला साजरी करण्याचे कारण :
हिंदू सण तिथीनुसार साजरे केले जातात. कोणतीही ज्या तारखेचा सूर्योदय पाहते ती तिथी त्यादिवशी असलेल्या सणासाठी ग्राह्य धरली जाते.
यंदा अक्षय्य तृतीया तिथी १९ ला नाही तर २० एप्रिलचा सूर्योदय पाहणार आहे, तसे असूनही १९ ला च अक्षय्य तृतीया साजरी केली जाईल.
कारण, हा सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो, खरेदीसाठीही सकाळची वेळ योग्य मानली जाते.
अशातच तृतीया तिथी २० तारखेचा सूर्योदय पाहणार असली तरी अवघ्या काही मिनिटातच, म्हणजे ७.२६ मिनिटांनी ती संपणार आहे.
त्यामुळे मुख्य सण १९ ला साजरा केला जाईल. यालाच पूर्वाह्य व्यापिनी तथा पूर्वार्ध व्यापिनी तिथी असे म्हणतात.
हे ही वाचा : Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
३. सोने खरेदीसाठी सर्वात शुभ मुहूर्त (Akshaya Tritiya 2026 Shubh Muhurat)
अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. १९ एप्रिल रोजी सोने खरेदीसाठी खालील वेळा अत्यंत फलदायी ठरतील:
सकाळचा मुहूर्त: सकाळी ६:१० ते दुपारी १२:२५ पर्यंत.
संध्याकाळचा मुहूर्त: दुपारी ४:३० ते सायंकाळी ७:०० पर्यंत.
४. या दिवसाचे धार्मिक महत्त्व (Akshaya Tritiya 2026 Importance)
परशुराम जयंती: याच दिवशी भगवान विष्णूंचे सहावे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता.
त्रेतायुगाचा प्रारंभ: धार्मिक मान्यतेनुसार, त्रेतायुगाची सुरुवात याच दिवशी झाली होती.
गंगावतरण: या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती असे मानले जाते.
हे ही वाचा : Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
५. काय करावे आणि काय टाळावे? ((Akshaya Tritiya 2026 Rituals)
दान-धर्म: या दिवशी गरजूंना पाणी भरलेला कलश, छत्री, पंखा किंवा अन्नाचे दान केल्याने पितृदोष दूर होतो.
नवीन सुरुवात: गृहप्रवेश, लग्न किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस स्वयंसिद्ध मुहूर्त आहे.
नकारात्मकता टाळा: या दिवशी कोणाशीही वाद घालू नका किंवा घरात भांडणे करू नका, कारण या दिवशीची ऊर्जा वर्षभर तुमच्या सोबत राहते.
Web Summary : Akshaya Tritiya 2026 falls on April 19th. The day is auspicious for new beginnings and gold purchases. The most auspicious times for buying gold are in the morning and evening. Donate to the needy and avoid negativity for prosperity.
Web Summary : अक्षय तृतीया 2026, 19 अप्रैल को है। यह दिन नए कार्यों और सोना खरीदने के लिए शुभ है। सोना खरीदने के सबसे शुभ मुहूर्त सुबह और शाम हैं। जरूरतमंदों को दान करें और समृद्धि के लिए नकारात्मकता से बचें।